loader
Breaking News
Breaking News
Foto

हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेना चिपळूणतर्फे अभिवादन!

चिपळूण (ओंकार रेळेकर) : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना चिपळूणच्या वतीने येथील शिवसेना संपर्क कार्यालयात त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या विचारांचे स्मरण केले. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणूस, हिंदुत्व आणि सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांसाठी केलेल्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेचे कार्य यापुढे अधिक जोमाने आणि एकजुटीने पुढे नेण्याचा निर्धार उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिकांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, तालुका समन्वयक सुधीरभाऊ शिंदे, शहरप्रमुख भैया कदम, युवासेना तालुका अधिकारी प्रीतम वंजारे, युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, शहर सचिव प्रशांत मुळये, उपतालुकाप्रमुख सचिन शेट्ये, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख सचिन चोरगे, युवतीसेना तालुका अधिकारी तीर्था लाड, महिला आघाडी शहर संघटक श्रद्धा घाडगे, उपशहरप्रमुख संजय रेडीज, राजन खेडेकर, मनोज पांचाळ, विभागप्रमुख शशिकांत शिंदे, मंगेश कोकीरकर, विलास चाळके, दीपक ओकटे, बंधू कदम, संकेत शिंदे, संतोष मिरगल, महेश संसारे, समीर राऊत,उपविभागप्रमुख नवीनचंद्र किल्लेकर, दीपक कदम, मयूर फटकुरे, शाखाप्रमुख महेंद्र काणेकर, आदर्श कदम आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg