loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा गोंडेसखल रोडवरील सड्यावर गांजासदृश अंमली पदार्थाचे सेवन करणार्‍या तरुणावर गुन्हा दाखल

लांजा (वार्ताहर) - झाडाझुडपाच्या आडोशाला बसून बेकायदेशीररित्या गांजा सदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करताना आढळून आलेल्या एका ४० वर्षीय तरुणावर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवार दि.२८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.५० वाजण्याच्या सुमारास लांजा गोंडेसखल रोड येथील सड्यावरील जंगलमय भागात घडली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित कुणाल मदन होलम (४० वर्षे, रा. लांजा एस.टी. स्टँड जवळ) हा बुधवार दि. २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.५० वाजण्याच्या सुमारास लांजा गोंडेसखल रोड येथील सड्यावरील जंगलमय भागात जंगली झाडाझुडपाच्या आडोशाला गांजासदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करीत असताना आढळून आला. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल नितेश आर्डे यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली.

टाईम्स स्पेशल

याप्रकरणी कुणाल मदन होलम याच्या विरोधात लांजा पोलीस ठाण्यात एनडीपी एस ऍक्ट १९८५ चे कलम ८ (क), २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड. कॉन्स्टे. विलास जाधव हे करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg