loader
Breaking News
Breaking News
Foto

नाम. योगेशदादा कदम यांचे प्रयत्नाने पाजपंढरी कफ परेड एसटी बस सेवा पूर्ववत सुरु

दापोली (प्रतिनिधी) : कोरोना संक्रमणाच्या काळात बंद ठेवण्यात आलेली पाजपंढरी कफ परेड ही एस.टी. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. यासाठी दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्राम विकास, व पंचायत राज, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न औषधी प्रशासन राज्यमंत्री नाम.योगेशदादा कदम यांनी प्रयत्न केले. तर यासाठी मंत्रिमहोदयांच्या सल्ल्याने जिल्हा परिषद सदस्य आणि शिवसेनेचे दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष किशोर देसाई यांनी सर्वतोपरी पाठपुरावा केला. दापोली तालुक्यातील पाज पंढरी हर्णे परिसरातील बहुतांश ग्रामस्थ मुंबई कफपरेड परिसरात वास्तव्यास आणि नोकरी निमित्त आहेत नोकरी, कामधंद्यानिमित्त वास्तव्यास असलेल्यांना या एसटी बसचा प्रवासासाठी मोठा उपयोग होत होता. मात्र कोरोना संक्रमण काळात बंद ठेवण्यात आलेली ही बस आजतागायत सुरू करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे कफ परेड ठिकाणी वास्तव्यास असलेल्यांना तसेच पाजपंढरी हर्णे परिसरातील प्रवाशांचा एस. टी. बस अभावी मोठीच गैरसोय होत होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यासाठी अनेकदा पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष गाठीभेटी व्दारे प्रयत्न करण्यात आले मात्र काही केल्या बस सेवा काही सुरू करण्यात आली नाही. अखेर नाम. योगेश कदम यांच्या कानावर हा विषय घालण्यात आला त्यानंतर मंत्रिमहोदयांनी विशेष लक्ष घालून या संदर्भात किशोर देसाई यांना पाठपुरावा करण्याचे सांगून बस सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला मंत्रिमहोदयांच्या निर्देशानुसार दीपावलीच्या शुभ मुहुर्तावर पाजपंढरी कफपरेड गाडी प्रत्यक्षात 9.15 वाजता मुंबईकडे रवाना होण्यासाठी पाजपंढरी येथे दाखल झाली. त्यांचा शुभारंभ पाज पंढरी गांवचे उपाध्यक्ष महेंद्र चोगले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

या प्रसंगी जिल्हापरिषद सदस्या ऐश्वर्या धाडवे, शिवसेना पदाधिकारी महेद्र चोगले, शिवसेना समन्वयक सोमनाथ पावसे, शिवसेना उपविभागप्रमुख भगवान चोगले, युवा सेना उपविभागीय अधिकारी वसंत भोईनकर, मोहन तबीब, आणि राष्ट्रवादीचे केशव वाघे, अंकुश दोरकुळकर, हरेन कुलाबकर, दत्ताराम वाघे, विष्णु तबीब, पांडुरंग रघुवीर, भगवान कुलाबकर, चंद्रकांत रघुवीर आदी उपस्थित होते. तर दापोली येथून एस टी बस मार्गस्थ होताना जिल्हापरिषद सदस्य किशोर देसाई, मुनाफ राजापकर, वाहतुक नियंत्रक नाफाडे, पत्रकार शेलेद्र केळकर, मंगेश शिंन्दे, रुपेश वाईकर तसेच गाडीचे चालक, वाहक आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते. ही नियमित एस टी बस पाजपंढरीतून रात्री ९ वाजता सुटेल तर कफपरेडहून सकाळी ७ वाजता सुटणार आहे, याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg