loader
Breaking News
Breaking News
Foto

कोनाळकट्टा येथील महालक्ष्मी वीज प्रकल्प करार नूतनीकरण करा; सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची आमदार जयंत पाटील यांच्याकडे मागणी

सावंतवाडी - दोडामार्ग तालुक्यातील कोनाळकट्टा येथील महालक्ष्मी विद्युत कंपनीचा महाराष्ट्र शासनासोबत संपुष्टात आलेला वीज खरेदी करार तातडीने नूतनीकरण करून या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज स्थानिक ग्राहकांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने आमदार जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. आमदार पाटील हे कुडाळ येथे आले असता या संदर्भातील निवेदन त्यांना सादर करण्यात आले. निवेदनामध्ये महाराष्ट्र-गोवा आंतरराज्य तिलारी प्रकल्पांतर्गत कार्यरत या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज स्थानिक वीज ग्राहकांना मिळणे अपेक्षित होते, मात्र महाराष्ट्र शासनासोबतचा करार संपल्यामुळे गेल्या चार वर्षांपासून स्थानिकांना विजेचा लाभ मिळत नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दुसरीकडे, गोवा राज्याने या कंपनीसोबत करार केल्यामुळे त्यांना नियमित वीज मिळत आहे, तर ज्या भूमीत प्रकल्प उभारला गेला तिथल्याच महाराष्ट्रातील नागरिकांना वीजटंचाईचा सामना करावा लागत आहे. ​दोडामार्ग तालुक्यातील ग्रामीण भागात विशेषतः पावसाळ्यात १२ तासांपर्यंत वीजेचा लपंडाव सुरू असतो, ज्यामुळे विद्यार्थी, शेतकरी आणि व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. शिवाय, गोवा राज्याला या कंपनीकडून सुमारे २ रुपये ८० पैसे प्रति युनिट दराने वीज मिळत असताना स्थानिक ग्राहकांना मात्र महावितरणकडून सुमारे ३ रुपये ४३ पैसे प्रति युनिट दराने आकारणी केली जात आहे.

टाईम्स स्पेशल

​या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी महालक्ष्मी विद्युत कंपनीचा संपुष्टात आलेला करार तातडीने नूतनीकरण करावा, तिलारी प्रकल्पातील वीज प्राधान्याने स्थानिकांना द्यावी, धरणग्रस्तांसाठी विशेष धोरण आखावे आणि ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या असून याप्रश्नी विधिमंडळात आवाज उठवून शासन दरबारी प्रभावी पाठपुरावा करावा, अशी विनंतीही जयंत पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.  संघटनेने यवाची निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे स्थानिक आमदार दीपक केसरकर तसेच काँग्रेस नेते बंटी पाटील यांनाही दिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg