loader
Breaking News
Breaking News
Foto

समान काम, समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; रत्नागिरी जिल्ह्यातील कर्मचारीही सहभागी!

रत्नागिरी - समान काम, समान वेतन या मागणीसाठी राज्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. या राज्यव्यापी आंदोलनात रत्नागिरी जिल्ह्यातील विविध न्यायालयांमधील कर्मचारीही सहभागी झाले आहेत. प्रलंबित वेतनश्रेणीचा प्रस्ताव तातडीने मंजूर करून न्यायालयीन कर्मचाऱ्यांना समान कामासाठी समान वेतनाचा लाभ द्यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राज्यातील न्यायालयांमध्ये विविध पदांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून समान कामासाठी समान वेतनाची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. यासंदर्भातील वेतनश्रेणीचा प्रस्ताव प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. वारंवार मागणी करूनही या प्रश्नावर ठोस निर्णय होत नसल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा मार्ग स्वीकारला आहे. १७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या संपात रत्नागिरी जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचारी सहभागी झाल्याने जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाजावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

टाईम्स स्पेशल

प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि वेतनश्रेणीचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. जोपर्यंत समान काम, समान वेतनाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत बेमुदत संप सुरू ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शासन या आंदोलनाची दखल घेऊन न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg