loader
Breaking News
Breaking News
Foto

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य केल्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी केले देवाभाऊंचे अभिनंदन

पनवेल : गेल्या पाच दशकांत अनुभवला नाही अशा भीषण दुष्काळाचे सावट महाराष्ट्रावर दाटले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील महायुती सरकारने पाणी, पीक आणि चारा नियोजनाबरोबरच, उद्योगांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना केल्या आहेत. राज्यातील ३०५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांचे अग्रिम अर्थसहाय्य जमा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी शेतकऱ्यांच्या वतीने फडणवीस सरकारचे अभिनंदन केले आहे. तसेच या महत्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील साडेतीन लाख कुटुंबांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा करून बळीराजाला मोठा दिलासा दिला आहे, अशा शब्दांत अविनाश कोळी यांनी समाधान व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीकरिता तगादा लावणाऱ्या यंत्रणांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सक्त तंबी दिली असून पिण्याचे पाणी आणि पुरेशा चारा उपलब्धतेसाठी ठोस उपाययोजनांद्वारे दुष्काळाशी दोन हात करण्याची तयारी करून फडणवीस सरकारने एक आदर्श उभा केला आहे. दुष्काळी तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले असून जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध व्हावा याकरिता चारा देणाऱ्या पिकांचे नियोजन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांकडून हमीभावाने चारा खरेदी करण्याचा निर्णय घेऊन जनावरांना जगविण्याची हमी सरकारने घेतल्याने शेतकऱ्यांनीही दुष्काळाचा सामना करण्यासाठी हातात हात घालून सरकारला साथ द्यावी असे आवाहनही अविनाश कोळी यांनी केले. राज्यातील दुष्काळी स्थिती ही नैसर्गिक आपत्ती आहे. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वांनी सामूहिकपणे प्रयत्न करण्याची गरज असताना या प्रश्नावर विरोधकांकडून केले जाणारे राजकारण दुर्दैवी आहे, अशी खंतदेखील अविनाश कोळी यांनी व्यक्त केली.

टाईम्स स्पेशल

राज्यात साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांचा वीजपुरवठा मोफत आहे. कर्जवसुलीच्या तगाद्यातून शेतकऱ्यास दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रिम मदत मिळणार आहे, दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना सरसकट परीक्षा शुल्क माफ करण्यात येत आहे. याशिवाय राज्यातील दोन लाखांहून अधिक अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना दोन हजार रुपयांची भाऊबीज देऊन सरकारने कुटुंबप्रमुखाची जबाबदारी संवेदनशीलतेने पेलली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना बारा हजार रुपयांच्या वार्षिक सन्मान निधीमुळे समस्याग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळालेला आहे. यासाठी राज्याच्या तिजोरीतून सहा हजार कोटींहून अधिक निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याने बळीराजासाठी संवेदनशीलतेने मदतीचा हात पुढे करणाऱ्या महाराष्ट्रातील फढणवीस सरकारचे अनुकरण काँग्रेसशासित राज्यांनी केले पाहिजे असा सल्लाही अविनाश कोळी यांनी दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg