loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना तालुकाप्रमुख सचिन धाडवे ’राजकीय भूषण पुरस्कार २०२६’ने सन्मानित

खेड (प्रतिनिधी) : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा खेड (ग्रामीण) संलग्न कुणबी युवा खेड व कुणबी महिला खेड, ता. खेड, जि. रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने कुणबी समाजोन्नती संघाचा १०६ वा वर्धापन दिन तसेच समाजनेते, माजी आमदार व शिक्षणमहर्षी स्व. तु. बा. कदम साहेब यांच्या १६ व्या स्मृतिदिनानिमित्त भव्य गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या गौरव सोहळ्यात राजकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची, प्रदीर्घ सेवाभावाची तसेच ज्ञान, अनुभव, कार्यकुशलता व कौशल्याच्या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाची दखल घेत शिवसेना खेड तालुकाप्रमुख तथा रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य सचिन विश्राम धाडवे यांना राजकीय भूषण पुरस्कार २०२६ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा मानाचा पुरस्कार रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शंकर कांगणे, अमित कदम, शंकर बाईत, आग्रे, जिल्हा परिषद सदस्या मानसी जगदाळे, शांताराम मसकर, रामचंद्र आईनकर, विजय जाधव, पंचायत समिती सदस्य प्रशांत चव्हाण, बाळू सनगरे, संदीप धाडवे यांच्यासह विविध पदाधिकारी, कुणबी समाजाचे मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg