loader
Breaking News
Breaking News
Foto

टेबल टेनिस प्रशिक्षक परीक्षेत सिंधुदुर्गातील प्रशिक्षकांचे घवघवीत यश

मालवण (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या वतीने व सूरज फाउंडेशन, सांगली यांच्या सहकार्याने आयोजित टेबल टेनिस प्रशिक्षकांच्या लेव्हल १ व लेव्हल २ प्रशिक्षण शिबिर व परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशिक्षकांनी घवघवीत यश संपादन केले आहे. मालवणचे प्रशिक्षक महेश तळवडेकर यांनी लेव्हल १ परीक्षेत ५० पैकी ५० गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावून विशेष कामगिरी केली. तर मालवणच्याच विष्णू कोरगांवकर आणि महेश तळवडेकर या दोन्ही प्रशिक्षकांनी लेव्हल १ व लेव्हल २ परीक्षा 'अ' श्रेणीत उत्तीर्ण होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या वतीने १६ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत नवकृष्णा व्हॅली गुरुकुल, सांगली येथे तीन दिवसीय प्रशिक्षक प्रशिक्षण शिबिर व परीक्षेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील टेबल टेनिस प्रशिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेचे सचिव यतीन टिपणीस यांच्या पुढाकारातून या प्रशिक्षण शिबिराचे व परीक्षेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरादरम्यान प्रशिक्षकांना टेबल टेनिस खेळातील तांत्रिक कौशल्ये, आधुनिक प्रशिक्षण पद्धती, खेळाडूंचा शारीरिक व मानसिक विकास, खेळाचे नियम, स्पर्धात्मक दृष्टिकोन तसेच प्रभावी प्रशिक्षण नियोजन यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षकांच्या ज्ञानात भर घालणे, त्यांची व्यावसायिक गुणवत्ता उंचावणे आणि महाराष्ट्रात शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या दर्जेदार प्रशिक्षकांची सक्षम फळी निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

टाईम्स स्पेशल

यामध्ये विष्णू कोरगांवकर आणि महेश तळवडेकर यांनी उल्लेखनीय यश मिळविले. या यशाबद्दल महासिंधु टेबल टेनिस असोसिएशनचे सचिव हेमंत वालकर, असोसिएशनचे पदाधिकारी तसेच मालवणमधील टेबल टेनिस प्रेमींनी विष्णू कोरगांवकर आणि महेश तळवडेकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या दोन्ही प्रशिक्षकांच्या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेबल टेनिस खेळाच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नवोदित व उदयोन्मुख खेळाडूंना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित, शास्त्रशुद्ध आणि दर्जेदार प्रशिक्षण उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच जिल्ह्यातील खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी सक्षमपणे तयार करण्याच्या दृष्टीने हे यश महत्त्वपूर्ण ठरणार आहे, अशी अशा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील मंडळीकडून व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg