loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्गचा सुपुत्र शुभम गवसची शरीरसौष्ठव स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी; गोवा व सावंतवाडीत मिळवले यश

दोडामार्ग (वार्ताहर) - शरीरसौष्ठव क्षेत्रात आपल्या मेहनतीच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन करत दोडामार्ग तालुक्याचा सुपुत्र शुभम शामराव गवस याने तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. गोवा येथे पार पडलेल्या ‘आयसीएन गोवा २०२६’ या शरीरसौष्ठव स्पर्धेत त्याने पुरुषांच्या प्रथमच सहभागी होणाऱ्या शरीरसौष्ठवपटूंच्या गटात पाचवा क्रमांक मिळवला. तसेच पुरुष क्लासिक फिजिक या प्रकारात सहभाग नोंदवत पदक प्राप्त केले. याचबरोबर सावंतवाडी येथे आयोजित ‘भाजपा श्री २०२६’ शरीरसौष्ठव स्पर्धेत ५५ ते ६० किलो वजनगटात ग्रुप विजेतेपद पटकावण्यासोबतच ‘सर्वोत्कृष्ट सुधारित शरीरसौष्ठवपटू’ हा किताब मिळवून आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शुभम गवस याने गोवा येथे झालेल्या ‘आयसीएन गोवा २०२६’ स्पर्धेत पुरुषांच्या प्रथमच सहभागी होणाऱ्या शरीरसौष्ठवपटूंच्या प्रकारात पाचवा क्रमांक मिळवला. तर पुरुष क्लासिक फिजिक या प्रकारातही सहभाग नोंदवत पदक मिळवले. पहिल्याच प्रयत्नात स्पर्धेच्या व्यासपीठावर उतरून त्याने केलेली ही कामगिरी विशेष कौतुकास्पद ठरली आहे. त्यानंतर भाजपचे युवानेते विशाल परब आयोजित सावंतवाडी येथील ‘भाजपा श्री २०२६’ या शरीरसौष्ठव स्पर्धेत ५५ ते ६० किलो वजनगटात प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत शुभमने ग्रुप विजेतेपदावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे ‘सर्वोत्कृष्ट सुधारित शरीरसौष्ठवपटू’ या विशेष किताबाने गौरविण्यात आले.

टाईम्स स्पेशल

शुभम शामराव गवस हा तावडे फिटनेस हब, दोडामार्ग येथे सराव करत असून त्याच्या या यशामुळे दोडामार्ग तालुक्यातील क्रीडाप्रेमी आणि युवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ग्रामीण भागातून पुढे येत शरीरसौष्ठव क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या शुभमची कामगिरी इतर युवकांसाठीही प्रेरणादायी ठरणारी आहे. शुभमच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून भविष्यात राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील शरीरसौष्ठव स्पर्धांमध्येही त्याने उल्लेखनीय कामगिरी करावी, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg