loader
Breaking News
Breaking News
Foto

अंध शिक्षकासाठी मानधनावर मदतनीस; नियम कोणता? वांझोळे गवळवाडी शाळेतील प्रकार; शिक्षण विभागाला माहिती, मात्र लोकप्रतिनिधी अंधारात!

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - देवरुख येथील जि. प. च्या वांझोळेे गवळवाडी शाळेत अवघ्या आठ विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या तीन शिक्षकांपैकी एका शिक्षकाची वर्षभरापूर्वी अचानक दोन्ही डोळ्यांचे दृष्टी गेली विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या उद्देशाने संबंधित शिक्षकांनी स्वतःच्या खर्चाने साबळे नामक व्यक्तीची मानधनावर मदतनीस म्हणून नियुक्ती केल्याची बाब समोर आली आहे. मात्र, शिक्षकाने परस्पर पद्धतीने मानधनावर मदतनीस ठेवणे कोणत्या नियमात बसते, हा आता गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वांझोळे गवळवाडी शाळेत सध्या मंश्रडवकर, आखाडे आणि प्रकाश रावणंग हे शिक्षक कार्यरत असल्याचे सांगण्यात येते. त्यापैकी प्रकाश रावणंग यांना सुमारे वर्षभरापूर्वी अचानक दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अंधत्वामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी स्वतःहून मदतनीस ठेवला. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने ही भूमिका मानवी दृष्टिकोनातून कौतुकास्पद असली, तरी शासकीय शाळेत अशा प्रकारे परस्पर मानधनावर मदतनीस नेमण्यास कोणत्या नियमाने परवानगी दिली आहे? याचे उत्तर मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे, रावणंग हे काही महिन्यांत सेवानिवृत्त होणार असल्याची माहिती आहे. तसेच ते स्वेच्छानिवृत्ती घेण्याची मागणी करीत असतानाही त्यांना स्वेच्छानिवृत्ती घेऊ दिली जात नसल्याची बाब पंचायत समितीच्या बैठकीत समोर आली. त्यामुळे स्वेच्छानिवृत्ती घेण्यास परंवानगी का दिली जात नाही, की कोणाचा आर्थिक स्वार्थ आहे याबाबतही आता प्रश्न उपस्थित होत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg