रत्नागिरी, : गेल्या पाच-सहा महिन्यांपूर्वी विदेशी मद्याच्या (इंडियन मेड फॉरेन लिकर - आयएमएफएल) किमतीत झालेल्या प्रचंड दरवाढीचा थेट परिणाम आता मद्यविक्रीच्या बाजारपेठेवर दिसू लागला आहे. विदेशी मद्याचे क्वार्टर आणि खंबे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला परवडेनासे झाल्याने अनेक दारूप्रेमींनी आपला मोर्चा बिअरकडे वळवला आहे. परिणामी, विदेशी मद्याच्या मागणीत घट होत असतानाच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बिअरच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
शासनाच्या कररचनेतील बदल आणि उत्पादन खर्चात झालेल्या वाढीमुळे पाच-सहा महिन्यांपूर्वी विदेशी मद्याच्या विविध लोकप्रिय ब्रँड्सच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली होती. या दरवाढीचा फटका सर्वसामान्य ग्राहकांच्या बजेटला बसला आहे. लोकप्रिय ब्रँड्सच्या क्वार्टरचे दर सरासरी ४० ते ७० रुपयांनी महागले असून, खंब्यांच्या (फुल बाटली) दरातही मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे, विदेशी मद्याच्या तुलनेत बिअरचे दर ग्राहकांच्या आवाक्यात राहिले आहेत. सध्या बाजारात बिअरचा कॅन सुमारे १६० रुपयांना, तर ७५० मिलीची बाटलीही विदेशी मद्याच्या क्वार्टरपेक्षा स्वस्त किंवा त्याच दरात उपलब्ध होत आहे. खिशाला परवडणारा आणि तुलनेने कमी तीव्रतेचा पर्याय म्हणून ग्राहकांचा बिअरकडे पाहण्याचा कल वाढला आहे. यामुळेच परमिट रूम, बिअर बार आणि वाईन शॉप्समध्ये बिअरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, विक्रीचा आलेख उंचावला आहे.
विदेशी मद्याच्या दरवाढीचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गीय ग्राहकांच्या पसंतीच्या ब्रँड्सना बसला आहे. यामध्ये 'मॅकडॉवेल'च्या क्वार्टरचा दर १६० रुपयांवरून थेट २१० रुपयांवर पोहोचला आहे. 'रॉयल स्टॅग'ची क्वार्टर १८० रुपयांवरून थेट २५० रुपये झाली असून, 'बॅगपायपर'चा दर १८५ रुपयांवरून २१० रुपयांवर गेला आहे. याबाबत मद्यविक्री व्यावसायिक म्हणाला, "विदेशी मद्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्यापासून नियमित ग्राहकांच्या खरेदीच्या सवयींमध्ये बदल दिसून येत आहे. क्वार्टर किंवा खंबा घेण्याऐवजी अनेक ग्राहक आता आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या बिअरला पसंती देत आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बिअरच्या विक्रीत चांगलीच वाढ झाली आहे."












































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.