loader
Breaking News
Breaking News
Foto

शायना एनसी यांच्या निषेधार्थ म्हसळ्यात शिवसेना उबाठाचे आंदोलन

म्हसळा (वार्ताहर) - शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शायना एनसी यांनी पत्रकार परिषदेदरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने म्हसळ्यात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी शायना एनसी यांच्या प्रतिमेचे दहन करून शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या कथित प्रकारामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी शायना एनसी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या आंदोलनाला शिवसेना उबाठाचे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख नंदू शिर्के, तालुका प्रमुख चाळके, गजानन शिंदे, अल्पसंख्याक नेते शौकत हजवाने, दीपल शिर्के, हेमंत नाक्ती, गणू बारे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी शिवसेना उबाठाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आणि त्यांच्या स्मृतीशी असलेली आपली निष्ठा व्यक्त करत संबंधित प्रकाराचा निषेध नोंदवला. आंदोलनामुळे म्हसळ्यात काही काळ राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg