रसायनी (आनंद पवार) - महावितरण कंपनीच्या आपटा येथील सबस्टेशनमध्ये अचानक तांत्रिक दुरुस्ती आणि ब्रेकरचे काम हाती घेण्यात आल्याने रसायनी परिसरातील वीजपुरवठा (मंगळवार दि.२७) रोजी जवळपास चार ते पाच तास खंडित झाला. कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक वीजपुरवठा बंद करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी आणि उद्योगधंद्यांना मोठा फटका बसला. महावितरणच्या या कारभाराबाबत रसायनी परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आपटा येथील महावितरणच्या सबस्टेशनमध्ये ब्रेकर आणि तांत्रिक दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे रसायनी परिसरातील वीजपुरवठा मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून खंडित करण्यात आला. मात्र, याबाबत परिसरातील नागरिक, व्यापारी आणि उद्योजकांना कोणतीही पूर्वकल्पना किंवा अधिकृत सूचना देण्यात आली नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. वीजपुरवठा अचानक खंडित झाल्याने दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला. दुकानदार, व्यावसायिक आणि विविध उद्योगांनाही याचा त्रास सहन करावा लागला. विशेष म्हणजे, सध्या उष्णतेमुळे नागरिक हैराण होत असताना अचानक वीज गायब झाल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली.
वीजपुरवठा हा आजच्या काळात नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. घरगुती कामांपासून ते व्यापारी व्यवहार आणि औद्योगिक उत्पादनापर्यंत अनेक कामे विजेवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत तांत्रिक दुरुस्ती करणे आवश्यक असले, तरी त्या कामामुळे वीजपुरवठा बंद ठेवावा लागणार असल्यास संबंधित परिसरातील नागरिकांना वेळेत पूर्वसूचना देणे तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र, रसायनी परिसरात अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने महावितरणच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दुरुस्तीचे काम आधीपासून नियोजित होते की अचानक उद्भवले, याबाबतही नागरिकांना स्पष्ट माहिती मिळणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. महावितरणकडून वीजबिल वेळेत भरण्याचे आवाहन करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जातो. अनेकदा गावोगावी ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना वीजबिल भरण्याच्या सूचना दिल्या जातात. मग वीजपुरवठा अनेक तास बंद राहणार असेल, तर त्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी याच माध्यमांचा वापर का केला जात नाही, असा संतप्त सवाल रसायनी परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत.
तांत्रिक बिघाड दूर करणे आणि वीजयंत्रणेची देखभाल करणे ही महावितरणची आवश्यक कामे आहेत. मात्र, अशा कामांचे नियोजन करताना नागरिकांची गैरसोय कमीत कमी होईल, याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. नियोजित दुरुस्तीमुळे वीजपुरवठा बंद ठेवायचा असल्यास वेळ, कालावधी आणि संभाव्य गैरसोयीबाबत नागरिकांना आधीच माहिती देण्यासाठी ध्वनिक्षेपक, एसएमएस किंवा इतर उपलब्ध माध्यमांचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. रसायनी परिसरातील नागरिकांनी प्रतिनिधीशी बोलताना महावितरणच्या या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. वीजबिल वेळेत भरण्याची अपेक्षा नागरिकांकडून केली जाते, तर नागरिकांनाही वीजपुरवठ्याबाबत वेळेत माहिती देण्याची जबाबदारी महावितरणने पार पाडावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. रसायनी परिसरातील वीजपुरवठा खंडित होण्याच्या या प्रकाराची महावितरणच्या संबंधित अधिकार्यांनी गांभीर्याने दखल घेऊन नागरिकांना पूर्वसूचना देण्याची प्रभावी व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी होत आहे. तांत्रिक कामे जरूर करा; मात्र नियोजनाअभावी सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि उद्योजकांना वेठीस धरू नका, अशी भावना परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे. आता तरी महावितरण प्रशासन या प्रकारातून धडा घेऊन नागरिकांना विश्वासात घेणार का? की, नागरिकांना अशाच प्रकारे अचानक वीजखंडित होण्याचा त्रास सहन करावा लागणार? याकडे रसायनी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.