loader
Breaking News
Breaking News
Foto

नगरपरिषद महिला बालकल्याण समितीच्या वतीने मॅट रांगोळी प्रशिक्षण उत्साहात

खेड (प्रतिनिधी) : खेड नगरपरिषद महिला बालकल्याण समितीच्या वतीने दिनांक ०८ ऑक्टोबर रोजी मॅट रांगोळी प्रशिक्षण संपन्न झाले. खेड शहरातील महिलांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी महिला बालकल्याण समितीच्या वतीने विविध प्रकारचे प्रशिक्षण राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मॅट रांगोळीचे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणाला बचत गटातील महिलांसह तळागाळातील १०० महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हे प्रशिक्षण दोन बॅचमध्ये राबविण्यात आले. या कार्यक्रमासाठी महिला बालकल्याण समिती सभापती सौ. रसिका राकेश खेडेकर, उपसभापती सौ. वर्षा तुषार सापटे, सदस्या सौ. दीप्ती ताई शिगवण, सौ. स्वप्नाली चव्हाण तसेच सौ. मीनाताई चिखले यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच या कार्यक्रमाला नगराध्यक्षा सौ. माधवीताई बुटाला, उपनगराध्यक्ष पप्पूशेठ चिकणे, मुख्याधिकारी रोडगे व शिवसेना गटनेते निकेतन पाटणे, नगरसेवक प्रेमळ चिखले, स्वप्निल सेतवडेकर, नगरसेविका सौ. नीता आंब्रे व नगरसेविका सौ. कुरणे ताई यांच्यासह सर्व विषय समिती सभापती व नगरसेवकांचे सहकार्य लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg