loader
Breaking News
Breaking News
Foto

विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल, जामगे प्रशालेचे उत्तुंग यश व एका खेळाडूची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

खेड - शिवतेज आरोग्य सेवा संस्था खेड संचलित छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल. जामगे मधील खेळाडूंनी शैक्षणिक वर्ष 2026- 27 मध्ये विभागस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये कुस्ती व बॉक्सिंग खेळामध्ये दैदिप्यमान यश मिळवले आहे. दिनांक 1 ऑक्टोबर ते 2 ऑक्टोबर 2026 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे पार पडलेल्या विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये प्रशालेतील खेळाडू अथर्व पार्टे याने सुवर्णपदक, रुद्र मोरे याने रौप्य पदक व 11 खेळाडूंनी कास्यपदके प्राप्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अथर्व पार्टे याची राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदर खेळाडूंना प्रशालेचे शिक्षण निदेशक विलास मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. दिनांक 5 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर 2026 या कालावधीत शाहूनगर, शेंद्रे. जिल्हा- सातारा येथे पार पडलेल्या विभागस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये प्रशालेतील ओम घाडगे, श्रवण बावळेकर व आशीर्वाद पाटील या खेळाडूंनी कास्य पदके प्राप्त केली. सदर खेळाडूंना प्रशालेचे शिक्षण निदेशक सचिन मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

टाईम्स स्पेशल

सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे संस्थापक आणि माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम, संस्थेच्या अध्यक्षा ज्योती रामदास कदम, राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम, संस्था सचिव योगिता कदम कापडी, संस्था सदस्य अण्णा कदम, संस्थेचे खजिनदार सुभेदार काशिराम सकपाळ, प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर खोत, कमांडंट श्रीकिशन यादव, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग यांनी अभिनंदन केले व अथर्व पार्टे यास परभणी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg