loader
Breaking News
Breaking News
Foto

शृंगारतळी येथील श्री नीळकंठेश्वर नवरात्री उत्सव मंडळ आयोजित नवरात्री उत्सवाचे आयोजन

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील श्री नीळकंठेश्वर नवरात्री उत्सव मंडळ आयोजित रविवार दि.११ ऑक्टोबर पासून ते बुधवार दि. २० ऑक्टोबरपर्यंत नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे संस्थापक : कै. सुशिल (आप्पा) सदाशिव वेल्हाळ यांच्या कृपाशीर्वादाने याही वर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. या नवरात्री उत्सवामध्ये महिलांसाठी खास आकर्षण लकी ड्रॉद्वारे रोज १ पैठणी जिंकण्याची सुवर्ण संधी मर्दा लाहोटी कलेक्शन यांच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. रोज १ मिल्टॉन मिक्सर लकी ड्रॉ द्वारे जिंकण्याची संधी टिप टॉप इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड फर्निचर सौजन्य : टॉप टेन फर्निचर अॅन्ड इलेक्ट्रॉनिक्स, सर्वांसाठी खास आकर्षण रोज १ डिनर सेट लकी ड्रॉ द्वारे जिंकण्याची सुवर्ण संधी सौजन्य:NN, एन. एन. आर्किटेक्चरल अॅन्ड डेव्हलपर्स, लकी ड्रॉ द्वारे रोज १ लॅपटॉप बॅग सौजन्य : साई इलेक्ट्रॉनिक्स वर्ल्डशेवटचे ३ दिवस आकर्षक भेटवस्तू लकी ड्रॉ द्वारे जिंकण्याची सुवर्ण संधी सौजन्य : स्वप्नप्रसाद कॉम्प्युटर्स आणि आशिर्वाद कोचिंग क्लासेस

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रविवार दि. ११ ऑक्टोबर रोजी रात्रौ १०.०० : आरती व दांडिया रास शुभारंभ, सोमवार,दि. १२ ऑक्टोबर रोजी रात्रौ ९ ते १० रंगभरण स्पर्धा, मंगळवार दि. १३ ऑक्टोबर रोजी रात्रौ ९ ते १० हस्ताक्षर स्पर्धा, बुधवार दि. १४ ऑक्टोबर रोजी सायं. ५ ते ७ बोंडला स्पर्धा (फुलांची रांगोळी), गुरुवार दि. १५ ऑक्टोबर रोजी सायं. ५ ते ७: रांगोळी स्पर्धा, शुक्रवार दि. १६ ऑक्टोबर रोजी रात्रौ ९ ते १० : संगित खुर्ची, शनिवार दि. १७ ऑक्टोबर रोजी रात्रौ १०.०० नंतर डान्स स्पर्धा (लहान गट), रविवार दि. १८ ऑक्टोबर रोजी रात्रौ १० नंतर डान्स स्पर्धा (मोठा गट) सोमवार दि. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी तसेच सायं. ७ ते ९ : खेळ पैठणीचा,रात्रौ १० नंतर : फॅन्सी ड्रेस स्पर्धा मंगळवार दि. २० ऑक्टोबर रोजी दसरा व बक्षीस समारंभ,बुधवार दि. २१ ऑक्टोबर रोजी गुहागर बीचवर विसर्जन तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष मनोज (बापू) कोळवणकर, उपाध्यक्ष जय गुहागरकर, सदस्य गौरव वेल्हाळ, उत्सव समिती अध्यक्ष मकरंद विचारे, उत्सव समिती उपाध्यक्ष महेश शिर्के यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg