loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूणमध्ये १६ वर्षांखालील तालुकास्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

चिपळूण (संतोष पिलके ): चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित १६ वर्षांखालील तालुकास्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला. सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत चिपळूण तालुक्यातील १६ शाळांचे संघ सहभागी झाले आहेत. ग्रामीण भागातील युवा क्रिकेटपटूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळावी आणि शालेय स्तरावर क्रिकेटला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत विविध शाळांमधील संघांमध्ये क्रिकेटचा थरार रंगणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उद्घाटनप्रसंगी चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दशरथशेठ दाभोळकर, चिपळूण नगरपरिषदेचे पाणीपुरवठा समिती सभापती निहार कोवळे, शिक्षण सभापती हर्षाली पवार, महिला व बालकल्याण समिती उपसभापती राणी महाडिक, नगरसेवक शशिकांत मोदी, नगरसेवक गणेश आग्रे, असोसिएशनचे सचिव राजेश सुतार, समालोचक सचिन कुलकर्णी, सुयोग चव्हाण, साईराज सावंत, योगेश बांडागळे, संदेश गोरिवले, प्रसाद देवरुखकर, विनीत देवधर, विक्रम भोसले आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg