loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूण नगरपालिका नवीन इमारतीचा उद्या भूमिपूजन सोहळा, पालकमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती

चिपळूण (संतोष पिलके) : चिपळूण नगरपालिकेची 150 वर्ष पूर्वीची इमारत आता पाडली जाणार असून त्या ठिकाणी अद्यावत अशी नवीन इमारत बांधली जाणार आहे. या कामाचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते उद्या शुक्रवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता पार पडणार आहे. सध्या चिपळूण नगरपालिकेचा कारभार बाळासाहेब ठाकरे शॉपिंग सेंटर आणि इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र या दोन ठिकाणी विभागला गेला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भूमिपूजन झाल्यानंतर येत्या दोन ते अडीच वर्षात ही इमारत उभी राहील, असा विश्वास नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी व्यक्त केला आहे. नगरपालिका प्रशासनातर्फे भूमिपूजन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून पालकमंत्री उदय सामंत यांच्या सोबत राज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला चिपळूण मधील सर्व लोकप्रतिनिधी माजी नगराध्यक्ष आणि नागरिकांना निमंत्रित करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg