loader
Breaking News
Breaking News
Foto

पाटपन्हाळे महाविद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाव्द्यिालयात आय. क्यु. ए. सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्यावतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांनी आपल्या मनोगतातून महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक कार्याचा संक्षेपात आढावा घेतला. अशा थोर महापुरुषाला आपण सर्वांनी अभिवादन करून त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन ते आचरणात आणावे म्हणजे खर्‍या अर्थाने या महापुरुषांना अभिवादन केले असे म्हणता येईल असे त्यांनी म्हटले. यावेळी प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव, प्रा. सौम्या चौघुले, प्रा. कांचन कदम, परशुराम चव्हाण व महाविद्यालयीन व्द्यिार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg