loader
Breaking News
Breaking News
Foto

‘युवा गणेश मित्र मंडळ - निव्याचा राजा’ ला शासनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

रत्नागिरी,दि.१६ (प्रतिनिधी)महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई आयोजित ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ मध्ये आपल्या संपूर्ण जिल्ह्यातून युवा गणेश मित्र मंडळ अर्थात ‘निव्याचा राजा’, निवे बुद्रुक (ता. संगमेश्वर)या मंडळाने प्रथम क्रमांकाचे मानाचे पारितोषिक पटकावले असून ही निवे बुद्रुक गावासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी सायंकाळी रविंद्र नाट्यमंदिर मुंबई येथे पार पडला.या मंडळाची स्थापना सन २००७-२००८ च्या सुमारास अवघ्या १२ मित्रांनी एका छोट्याशा खोलीत बसून केली होती. सुरुवातीच्या काळात काही प्रमाणात विरोधाचाही सामना करावा लागला, परंतु सर्व मित्रांच्या एकजुटीने, जिद्दीने आणि अथक परिश्रमाने हे मंडळ आज भक्कमपणे उभे राहिले आहे. आज या मंडळात तब्बल ५० सक्रिय सदस्य आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मंडळास यापूर्वी मिळालेले सन्मान : - पु. ल. देशपांडे महाराष्ट्र शासन - संगमेश्वर तालुका प्रथम सन्मान - रत्नागिरी पोलीस अधीक्षक सन्मान - देवरूख पोलीस ठाणे सन्मान - मंगलमूर्ती सजावट स्पर्धा सन्मान - शिस्तप्रिय मंडळ सन्मान या मंडळाने सामाजिक बांधिलकी जपून पाणी अडवा पाणी जिरवा, इतिहास साक्ष देखावा, धार्मिक देखावा आणि यावर्षीचे विशेष आकर्षण ‘किल्ले संवर्धन काळाची गरज - किल्ले महिमतगड’ हा देखावा सादर केला होता.

टाइम्स स्पेशल

मंडळाचे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम : सांस्कृतिक महिला फुगडी कार्यक्रम, खेळ पैठणीचा, होम मिनिस्टर, शैक्षणिक साहित्य वाटप, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, विद्यार्थी सन्मान, वृक्ष लागवड, स्वच्छता मोहीम, नदी पात्र स्वच्छता, मंदिर स्वच्छता, ज्येष्ठांचा सन्मान, विधवा माता सन्मान, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, छत्रपती शिवाजी महाराज जीवन परिचय व्याख्यान आदी उपक्रम मंडळ वर्षभर राबवित असते.हा सन्मान सोहळा दि. १६ ऑक्टोबर रोजी सायं. ३ वाजता, रवींद्र नाट्य मंदिर, पु. ल. देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई* येथे पार पडला असून या सोहळ्यास ना. अॅड. आशिष शेलार (सांस्कृतिक कार्यमंत्री), ना. मंगल प्रभात लोढा (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री),. अनिल देसाई खासदार, महेश सावंत विधानसभा सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती. या यशाबद्दल मंडळाच्या सर्व जुन्या-नव्या सदस्यांचे, पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg