दापोली (चंद्रशेखर जोशी) - कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या वारीसाठी दापोली येथून निघालेल्या वारकर्यांच्या प्रवासात मद्यपान केलेल्या अवस्थेतील एसटी चालकामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेमुळे वारकर्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या प्रकरणी भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेत एसटी प्रशासनाला जाब विचारत संबंधित चालकाच्या निलंबनाची मागणी केली होती. अखेर या मागणीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयाने संबंधित चालकावर निलंबनाची कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दापोली बस स्थानकातून वारकर्यांना घेऊन जाणार्या गाडीवरील चालक अंकुश बबन ठाणगे यांनी मद्यपान केले असल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. चालकाने मद्यपान केल्यामुळे आळंदी येथे वारकर्यांच्या गाड्या थांबविण्याची वेळ आली. सकाळी सात वाजल्यापासून चालक मद्यपान केलेल्या अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे वारकर्यांचा तब्बल सहा ते सात तास खोळंबा झाला. अखेर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास प्रभारी अधिकार्यांनी दुसर्या चालकाची व्यवस्था केल्यानंतर गाड्या पुढील प्रवासासाठी रवाना झाल्या.
या घटनेची गंभीर दखल घेत भाजप पदाधिकार्यांनी दापोली एसटी प्रशासनाला धारेवर धरले. धार्मिक यात्रेसाठी निघालेल्या वारकर्यांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही. चालकाची योग्य तपासणी न करता त्याला प्रवासी वाहतुकीची जबाबदारी कशी देण्यात आली? असा सवाल उपस्थित करत संबंधित चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी रत्नागिरी विभागीय कार्यालयाकडून विभागीय आस्थापना आदेश क्रमांक ३७०, दिनांक १७ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार, चालक तथा वाहक अंकुश बबन ठाणगे, रा.प. दापोली आगार यांना त्यांच्या कथित गैरवर्तनाच्या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. विभागीय वाहतूक अधिकारी, रा.प. रत्नागिरी यांनी जारी केलेल्या आदेशात संबंधित चालकाने कर्तव्यावर असताना मद्यपान केल्याच्या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. निलंबन कालावधीत त्यांना निर्वाह भत्ता नियमानुसार देण्यात येणार असून, मुख्यालय दापोली आगार निश्चित करण्यात आले आहे. तसेच पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत एसटी प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. मात्र, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी दापोली एसटी आगार प्रशासनाने चालकांची ड्युटीपूर्वी योग्य तपासणी करावी आणि वारकर्यांसह सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या प्रकरणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते, तालुका सरचिटणीस संदीप केळकर, विवेक भावे, अजय कदम, सोशल मीडिया संयोजक बापू लिंगावळे, ओंकार जोशी, ओंकार वेल्हाळ, वीरेंद्र लिंगावळे, प्रमोद पांगारकर, मयुरेश वेल्हाळ आदी पदाधिकार्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.