loader
Breaking News
Breaking News
Foto

आंजणारी घाटातील अपघाताची मालिका थांबणार केव्हा? पोलिस व्हॅनचा अपघात धक्कादायकच ठरला; संतोष गायकवाड यांचा मृत्यू वेदना देवून गेला

लांजा (संजय साळवी) - दोन दिवसांपूर्वी आंजणारी घाटीत कंटेनरने मागून पोलिस व्हॅनला दिलेली धडक काळजाचा थरकाप उडवणारी ठरली. गेल्या आठवड्यातच स्थानिक पत्रकारांनी आंजणारी घाटी संदर्भात आवाज उठविला होता. सर्वात धोकादायक ही घाटी ठरत आहे. अनेक अपघात या घाटीत घडत आहेत. पोलिस व्हॅनचा अपघात धक्कादायकच ठरला. मुंबई - गोवा महामार्गावरील आंजणारी पुलाजवळ अपघात झाला असल्याचा कॉल लांजा पोलिसांच्या ११२ नंबर वर आल्यानंतर त्याची पाहणी करण्यासाठी जाणार्‍या हातखंबा वाहतूक शाखेच्या पोलीस व्हॅनला (एमएच ०८ बीई ३६६१) गोव्याच्या दिशेने जाणार्‍या बावीस चाकी कंटेनरने (क्र. आर जे. ०९ जीइ २३९७) पाठीमागून जोरदार धडक दिल्याने पोलीस व्हॅन चेंडू सारखी उडत जाऊन २०० फुट काजळी नदीपात्रालगत कोसळून झालेल्या भीषण अपघातामध्ये एका पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू झाला तर दुसरा कर्मचारी गंभीर जखमी झाला. या अपघातामध्ये कंटेनर चालक आणि क्लीनर असे दोघेही जागीच ठार झाले. हा अपघात आंजणारी पुलाजवळ शनिवारी रात्री ११.१५ वाजता घडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, रविवारी सकाळी दहा वाजता दरीत कोसळलेली अपघातग्रस्त पोलीस व्हॅन क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली असून या दुर्घटनेमध्ये हातखंबा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष आप्पासाहेब गायकवाड (५१ वर्षे) यांचा मृत्यू झाला असून चालक अनिल अशोक शिंगाडे (३५ वर्षे) हे गंभीर जखमी झाले. तसेच या अपघातामध्ये कंटेनर चालक मदन हेमसिंग (४१ वर्षे, राहणार पाली जिल्हा, राजस्थान) तसेच क्लीनर या दोघांचा जागीच मृत्यू झाला. संतोष गायकवाड यांनी रत्नागिरीतही सेवा बजावली होती. त्यामुळे एक लोकप्रिय पोलिस कर्मचारी म्हणून त्यांची ओळख समाजमनात होती. त्यामुळे त्यांच्या अपघाती निधनाने अनेकांना धक्का बसला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg