वरवेली (वार्ताहर) - गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील सीएनजी पंपावर वाहनांची होणारी गर्दी आता जानवळे गावातील ग्रामस्थांना अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहे. सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा रस्त्याच्या एका बाजूला लागत असल्याने जानवळे गावात जाणार्या व येणार्यां वाहकधारकांना या ठिकाणी समोरून वाहने उभी असल्यामुळे राष्ट्रीय महार्गावरील येणार्या वाहनाचा अंदाज येत नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला असून, वाहतुकीचा खोळंबाही होत आहे.
या समस्येवर तातडीने कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष विनोद गणेश जानवळकर यांनी केली आहे. गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर आता कोकणवासीय मुंबई, पुणे तसेच इतर ठिकाणी परतू लागले आहेत. त्यामुळे शहर आणि परिसरातील प्रमुख मार्गांवर वाहनांची संख्या वाढली आहे. त्याचा परिणाम शृंगारतळी येथील सीएनजी पंपावरही दिसून येत असून, सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. येथील सीएनजी पंपाच्या परिसरात रस्त्यावरून जानवळे गावातील वाहनधारक व ग्रामस्थ त्यांच्यामध्ये भीतीच वातावरण होतं आहे.
सीएनजीसाठी उभी असलेली वाहने रस्त्याच्या एका बाजूला मोठ्या संख्येने जमा झाल्यानंतर समोरून येणार्या वाहन चालकाला अंदाज घेणे कठीण होते. त्यामुळे येथे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या वाहनांच्या रांगांमुळे काही दिवसापूर्वी रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या वाहनाचे नुकसान झाले होते. पंप व्यवस्थापक यांनी सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज आहे तसेच वाहतूक नियंत्रण यंत्रणेने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी विनोद जानवळकर यांनी केली आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.