loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात प्रथमच! रत्नागिरी शहरातील माळनाका येथे स्कायवॉकचे होणार भव्य ’आर्ट गॅलरीत’ रूपांतर..

रत्नागिरी - महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी शहराचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून साकारत आहे महाराष्ट्रातील पहिली अनोखी स्कायवॉक आर्ट गॅलरी. साधारण १७० फूट लांबीच्या भव्य गॅलरीत नामांकित आणि तरुण कलाकारांच्या कलाकृतींना मिळणार कायमस्वरूपी मंच. महाराष्ट्राच्या कला आणि सांस्कृतिक विश्वात एका सुवर्णपानाची भर पडत आहे. महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून एका आगळ्यावेगळ्या प्रकल्पाची पायाभरणी होत असून, माळनाका येथील स्कायवॉकचे आता एका भव्य ’आर्ट गॅलरी’ मध्ये रूपांतर केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्रात अशा प्रकारची स्कायवॉक आर्ट गॅलरी प्रथमच उभारण्यात येत असून, कलाप्रेमींसाठी हे एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. साधारण १५० फूट लांबीची ही अत्यंत भव्य आणि सुसज्ज आर्ट गॅलरी असणार आहे. या गॅलरीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, यात महाराष्ट्रातील नामांकित चित्रकार, शिल्पकार तसेच विविध कला माध्यमांमध्ये उल्लेखनीय काम करणार्‍या दिग्गज कलाकारांच्या उत्कृष्ट कलाकृती कायमस्वरूपी प्रदर्शित केल्या जाणार आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांना आणि बाहेरून येणार्‍या पर्यटकांना एकाच छताखाली उच्च दर्जाच्या कलाकृतींचा आस्वाद घेता येणार आहे.

टाईम्स स्पेशल

केवळ प्रथितयश कलाकारच नव्हे, तर नवनवीन कल्पना घेऊन येणार्‍या उदयोमुख तरुण कलाकारांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी या गॅलरीमध्ये एक विशेष स्वतंत्र दालन राखीव ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून तरुण कलाकारांना आपली कला राज्यासमोर व देश पातळीवर सादर करण्यासाठी एक हक्काचे आणि भव्य व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. ना. उदय सामंत यांच्या या दूरगामी विचारांमुळे जिल्ह्याच्या सौंदर्यात भर तर पडेलच, शिवाय हे ठिकाण महाराष्ट्राचे एक प्रमुख सांस्कृतिक आणि कलात्मक केंद्र म्हणून नावारुपास येईल, असा विश्वास आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून, लवकरच ही आर्ट गॅलरी कलाप्रेमींसाठी खुली करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg