दापोली (चंद्रशेखर जोशी) : दापोली तालुक्यातील कुंभवे येथील काजूच्या बागेला आग लागून सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे. या आगीत 15 वर्षापूर्वी लागवड केलेली ७२० काजूची झाडें होरपळून गेली असून झाडांना पाणीपुरवठा करण्यासाठी उभारलेली पाइपलाइन जळून खाक झाली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईचे माजी पोलीस आयुक्त हेमंत नामदेवराव नगराळे यांची दापोली तालुक्यातील कुंभवे येथे शेत जमीन (बाग) असून त्यात दयानंद गोविंद रुके (वय ५२, रा. साखळोली, ता. दापोली) हे बागेच्या देखभालीचे काम करतात.
रुके यांनी दापोली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास कुंभवे येथील काजू बागेची पाहणी करून घरी परतले होते. त्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ते पुन्हा बागेत गेले असता बागेतील वाळलेले गवत व तण जळालेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी बागेची पाहणी केली असता सुमारे आठ एकर क्षेत्रात असलेली काजूची ७२० झाडे आगीने होरपळून गेली होती तसेच झाडांना पाणी देण्यासाठी बसविण्यात आलेली पाइपलाइन पूर्णपणे जळून गेल्याचे त्यांचे निदर्शनास आले. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काजू बागेतील वाळलेल्या गवताला आग लावल्यामुळे ही घटना घडल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे.
या आगीत सुमारे १० लाख रुपये किमतीची काजूची झाडे आणि पाच लाख रुपये किमतीची पाइपलाइन असे एकूण १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३२६ (एफ) प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक हेमराज निर्मळ करत आहेत.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.