loader
Breaking News
Breaking News
Foto

पाळ्ये तिठ्यावर अडीच तास आंदोलन; पोलिसांशी शाब्दिक बाचाबाची, १६ नोव्हेंबरपासून काम सुरु करण्याची हमी दिल्याने आंदोलन मागे

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - राज्य सरकारने गरज नसताना केवळ परजिल्ह्यातील ठेकेदार, कार्यकर्त्यांचे चोचले पुरवण्यासाठी दोडामार्ग ते विजघर हा तीस किलोमीटर रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा घाट घातला काम सुरू झाले. पण बेजबाबदार ठेकेदार कंपनीमुळे नागरिक, वाहन धारकांचा जीव धोक्यात आला असून अपघात वाढले. तिलारी ते विजघर रस्ता अपूर्ण ठेवून ठेकेदार गायब झाला. या रस्त्यावर अपघात वाढले पण प्रशासकीय अधिकारी कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्याने सिंधुदुर्ग सरपंच सेवा संघटना अध्यक्ष तसेच या भागातील सामाजिक ककार्यकर्त्यांनी प्रशासन, ठेकेदार यांचे लक्ष वेधण्यासाठी आज गुरूवारी पाळये तिठयावर अडीच तास रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रविण गवस, दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्यात चांगली शाब्दिक चकमक जुगलबंदी रंगली. या रस्ता रोको आंदोलनामुळे गोवा, दोडामार्ग, बेळगाव, कोल्हापूर वाहतूक ठप्प झाली. अखेर १६ नोव्हेंबर रोजी काम सुरू केले जाईल, असे लेखी पञ ठेकेदाराने दिले. या नंतर आंदोलन मागे घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तिलारी ते विजघर दरम्यान काम करणार्‍या संबंधित ठेकेदाराने रस्ता पूर्ण खोदून ठेवला आहे. एका ठिकाणी काम पूर्ण न करता पुढे डांबरीकरण केलेला रस्ता तोडून आणखी धोका निर्माण केला. पावसाळ्यात जीव धोक्यात घालून वाहन धारकांनी, नागरीकांनी प्रवास केला. संपूर्ण रस्ता उखडला गेला धुळीचे, खड्डयाचे साम्राज्य, सहन करत प्रवास केला. रस्ता अपूर्ण यामुळे अनेक जण जखमी झाले पण ठेकेदार लक्ष देईना प्रशासन लक्ष देईना अशी भयानक परस्थिती निर्माण झाली, यामुळे या मार्गावर प्रवास करणे धोकादायक बनले. दोडामार्ग आमसभेत रस्ता निर्माण अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या. शिवाय गेल्या आठवडयात आम. दिपक केसरकर यांनी पाहणी केली संबंधित ठेकेदार अधिकारी यांना सूचना दिल्या. संबंधित अधिकारी यांना दर गुरुवारी दोडामार्गमध्ये या अशा सूचना देऊन देखील संबंधित अधिकारी हजर न राहता ठेकेदाराला पाठीशी घालतात हे दिसून आले.

टाईम्स स्पेशल

तिलारी ते विजघर रस्ता अपूर्ण काम तातडीने सुरू झाले पाहिजे यासाठी आज गुरुवारी सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रविण गवस यांनी या मुख्य मार्गावर पाळये तिठयावर रस्ता रोको आंदोलन सुरू केले. या आंदोलनात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, ठाकरे शिवसेना पदाधिकारी संतोष मोरये, मदन राणे, सामाजिक कार्यकर्ते मनोहर गवस, संदेश वरक, लखू खरवत, यांच्या समवेत, पाळये, सोनावल, मेढे, हेवाळे, मुळस, विजघर, बांबर्डे, तसेच इतर गावातील स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्ते रस्त्यावर बसून आंदोलन करत पोलिसांची संवाद साधत असताना पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी प्रविण गवस यांच्यावर चक्क अंगावर धावून आला, असा आरोप केला. यामुळे उपस्थितात एकच हसू आली. १६ नोव्हेंबर रोजी काम सुरू झाले नाही तर १७ नोव्हेंबर रोजी पूर्व कल्पना न देता तीव्र आंदोलन केले, जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg