loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रदेश ओबीसी सेलच्या उपाध्यक्षपदी संतोष सुतार

नवी मुंबई : काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेले संतोष सुतार यांची सामाजिक कार्याची तळमळ, संघटन कौशल्य, पक्षनिष्ठा तसेच ओबीसी समाजाच्या प्रश्नांबाबत असलेली बांधिलकी लक्षात घेऊन ओबीसी प्रदेश काँग्रेस कमिटीने त्यांची नियुक्ती प्रदेश उपाध्यक्षपदी केली आहे. त्यांना त्यांच्या नियुक्तीचे पत्र ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे यांनी नुकतेच प्रदान केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी तसेच ओबीसी सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनिल जयहिंद यांच्या मान्यतेने महाराष्ट्रात हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्षांचे सृजनशील नेतृत्वात काँग्रेस पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी, ओबीसी विभागाचे संघटन अधिक मजबूत करावे. नवीन कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडावे, पक्षाचे विविध कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यास सहकार्य करावे, या सोबतच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनानुसार संघटन विस्ताराचे कार्य करावे, संघटनात्मक कार्यपद्धती व शिष्टाचार पाळावे, असे या नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg