loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त संगमेश्वरात उद्या मोटारसायकल रॅलीचा उत्साह!

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीने गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता राष्ट्रीय एकता मोटारसायकल रॅलीच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. देशाची एकात्मता, बंधुता आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणार्‍या या रॅलीमुळे संगमेश्वर परिसरात देशभक्तीचा उत्साह अनुभवायला मिळणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी गुजरातमधील केवडिया येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ परिसरात राष्ट्रीय एकता परेडचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमाच्या अनुषंगाने राष्ट्रीय एकता मोटारसायकल रॅली काढण्यात येत असून, कर्नाटक, गोवा, केरळ आणि लक्षद्वीप येथील पोलीस दलांचे अधिकारी व अंमलदार या रॅलीत सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय एकतेचा संदेश घेऊन येणारी ही मोटारसायकल रॅली गुरुवार, २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता संगमेश्वर पोलीस ठाणे हद्दीतून तळेकांटे ते आरवली या मार्गाने मार्गक्रमण करणार आहे. या रॅलीच्या स्वागतासाठी धामणी येथील गोळवली परिसरातील सनराइज हॉटेल येथे स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

देशाच्या विविध भागांतील पोलीस दलांना एका सूत्रात बांधणारी ही रॅली राष्ट्रीय एकात्मता, परस्पर समन्वय आणि बंधुभावाचे प्रतीक ठरणार आहे. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला बळ देणार्‍या या उपक्रमात नागरिकांनी उपस्थित राहून स्वागत समारंभाची शोभा वाढवावी, असे आवाहन संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे. राष्ट्रीय एकता दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या रॅलीमुळे संगमेश्वर तालुक्यात देशभक्तीचे वातावरण निर्माण होणार असून, विविध राज्यांतील पोलीस दलांच्या सहभागातून राष्ट्रीय एकतेचा संदेश अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg