loader
Breaking News
Breaking News
Foto

झेप फाउंडेशन संस्थेतर्फे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सन्मान

पुणे - 'आम्ही कोणासोबत जाणार नाही. यायचं असेल तर आमच्या या,' असा खणखणीत संदेश देत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या. तसेच आपली वाटचाल पुन्हा तेवढ्याच तडफेने सुरू राहील, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. आगामी काळात निवडणुकांचे निकाल फिरवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारच्या दुष्काळ निवारण धोरणातील त्रुटींवर सडकून टीका केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आपल्या भाषणात शरद पवारांनी पक्षात सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चावर स्पष्ट शब्दांत पडदा टाकला. ते म्हणाले, "राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा पक्ष आहे. आम्ही कुणाच्याही जवळ जाणार नाही किंवा इतर कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही. ज्यांना यायचे असेल त्यांनी आमच्यात यावे, आम्ही कुणाच्यात जाणार नाही. हा निर्णय पक्का असून, आपल्याला आता थेट लढाई द्यायची आहे," असा स्पष्ट संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर भाष्य केले. ते म्हणाले, 'अजित पवार असताना विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली. मात्र, ते गेले आणि हा मुद्दा मागे पडला.

टाईम्स स्पेशल

शरद पवारांच्या सूचनेनुसार हे विलीनीकरण होणार होते. विलीनीकरणावर सतत चर्चा सुरू होती. कार्यकर्ते अस्वस्थ होते, असे चित्र रंगवले जायचे. मात्र, आज शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केलीय. आता ज्यांना विलीनीकरण करायचे आहे, त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे. हीच शरद पवारांची भूमिका आहे,' असे आवाहनही त्यांनी केले. सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या भूमिकेबाबत भाष्य करताना, पक्ष अडचणीत नसून सध्याच्या परिस्थितीशी लढण्याच्या मूडमध्ये असल्याचे म्हटले. राज्यात सध्या जे चित्र दिसत आहे, त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात बसण्यापेक्षा विरोधी पक्षात राहून जनतेचे प्रश्न मांडणे अधिक योग्य असल्याचे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg