loader
Breaking News
Breaking News
Foto

अनधिकृतपणे खाजगी दुचाकी भाड्याने देणार्‍यांवर आरटीओची धडक कारवाई

रत्नागिरी - जिल्ह्यात काही व्यक्ती अनधिकृतपणे खाजगी दुचाकी वाहने भाड्याने देत असलेबाबत रिक्षा व टॅक्सी व्यावसायिक संघटना यांचे मार्फत तक्रारी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाला प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने कार्यालयातील अंमलबजावणी पथकातील अधिकार्‍यांनी विशेष तपासणी मोहीम राबविली. अश्या प्रकारे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणार्‍या १४ वाहन धारकांवर कारवाई आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी सदर वाहने जप्त करण्यात येऊन दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सदर १४ दोषी वाहनांवर एकूण ८५५००/- रुपये दंड आकारण्यात आला आहे. सदर मोहीम यापुढे देखील चालूच राहणार आहे. अश्याप्रकारे नागरिकांनी खाजगी वाहने भाड्याने देऊ नयेत, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg