संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील लोवले फटकरेवाडी येथे एका ७५ वर्षीय वृद्धाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना ५ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. अनंत यशवंत फटकरे (वय ७५) असे मृत वृद्धाचे नाव आहे. मुलाचे निधन आणि त्यानंतर पत्नीच्या विरहाचा आघात सहन करावा लागलेल्या अनंत फटकरे यांच्या मृत्यूच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अनंत फटकरे यांच्या आयुष्यात गेल्या काही वर्षांत दुःखाचे मोठे प्रसंग आले होते. दीड वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाचे अचानक निधन झाले, तर वर्षभरापूर्वी पत्नीचेही निधन झाले. आयुष्याच्या उत्तरार्धात कुटुंबातील दोन महत्त्वाच्या व्यक्तींची साथ सुटल्याने ते एकाकी झाले होते. मुलाच्या आठवणी आणि पत्नीच्या विरहामुळे त्यांना मोठा मानसिक धक्का बसला होता. ते मानसिक तणावातून जात होते. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० ते सायंकाळी ४.४५ या कालावधीत त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना घडली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. या घटनेमुळे फटकरेवाडी परिसरात शोक व्यक्त होत आहे.
या प्रकरणी त्यांची मुलगी क्षमा अमित कळंबटे यांनी दिलेल्या माहितीनुसार संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुलगा आणि पत्नीच्या निधनानंतर निर्माण झालेला एकाकीपणा त्यांच्या आयुष्यातील मोठी वेदना ठरला होता. या घटनेच्या निमित्ताने एकाकी जीवन जगणार्या ज्येष्ठ नागरिकांना कुटुंबीयांचा सहवास, आपुलकी आणि मानसिक आधार मिळण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. आयुष्याच्या संध्याकाळी आधाराची गरज असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.