loader
Breaking News
Breaking News
Foto

नारळ काढताना विजेचा धक्का: उंबर्लेच्या पोलीस पाटलांचा दुर्दैवी मृत्यू, गावावर शोककळा

दापोली (वार्ताहर) : दापोली तालुक्यातील उंबर्ले गावचे कार्यरत पोलीस पाटील संतोष बाळू नाचरे यांचे रविवारी २२ नोव्हेंबर दुपारी विजेचा तीव्र धक्का लागून दुर्दैवी निधन झाले. नारळ काढण्यासाठी माडावर चढलेले असताना घडलेल्या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याने उंबर्ले गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल ता. २२.११.२६ रोजी दुपारी ३ चे सुमारास उंबर्ले येथे बाळू गोविंद नाचरे व त्यांचा मुलगा संतोष नाचरे यांनी घराशेजारी असलेल्या माडावरून नारळ काढण्यासाठी शिडी लावली. संतोष नाचरे हे शिडीवर चढून पानकापीने नारळ काढत होते तर बाळू नाचरे हे शिडी धरून उभे होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अचानक संतोष नाचरे यांचा तोल गेला व तांच्या हातातील लोखंडी पानकापी जवळून जात असलेल्या महावितरणाच्या विजेच्या तारेला लागली. त्यामुळे विजेचा जोरदार धक्का लागून संतोष नाचरे जमिनीवर पडून बेशुद्ध झाले. त्यांना लगेच उपचारासाठी दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. यासंदर्भात दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg