loader
Breaking News
Breaking News
Foto

२०० कोटींचा निधी असूनही काजू बोर्ड दिशाहीन : विलास सावंत, कृषी उत्पन्न बाजार समितीही निष्क्रिय; दोन्ही संस्थांनी भूमिका स्पष्ट करावी

बांदा (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक आणि बागायतदार शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालेल्या काजू बोर्डाला २०० कोटींचा निधी मंजूर होऊन दोन वर्षे उलटली, तरी ठोस कार्यवाही होत नसल्याबद्दल सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काजू बोर्डासह सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी संघाचे विलास सावंत यांनी केली. जिल्ह्यातील ६० ते ६५ टक्के शेतकऱ्यांचे जीवन काजू पिकावर अवलंबून आहे. मात्र, काजू बोर्डाच्या बैठका घेण्यापलीकडे प्रत्यक्ष काम दिसत नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीकडूनही फळे व अन्नधान्याला हमीभाव आणि खरेदीसाठी कोणतेही ठोस प्रयत्न होत नसल्याची टीका त्यांनी केली. राजकीय निष्ठेपेक्षा संस्थांवरील नियुक्त्यांमध्ये पात्रता व अभ्यासाला प्राधान्य द्यावे. आमदारांनी व्यापाऱ्यांप्रमाणेच शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशीही संवाद साधावा. दोन्ही संस्थांना दिशा सापडत नसल्यास सर्व शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्या सूचना घ्याव्यात, असे आवाहन सावंत यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg