loader
Breaking News
Breaking News
Foto

मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या गणेश स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभासाठी अनेकांचे योगदान

रत्नागिरी : ‘श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान’ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मंगलमूर्ती सजावट स्पर्धे’चा पारितोषिक वितरण सोहळा रवि. दि. २७ सप्टें. २०२६ रोजी मोठ्या थाटात व दिमाखात संपन्न झाला. खेड्यापाड्यातील हरहुन्नरी व होतकरु कलावंतांना उत्तेजन देण्यासाठी मंगलमूर्ती प्रतिष्ठानचा हा कार्यक्रम अतिशय उपयुक्त ठरल्याची भावना याबाबत बोलताना अनेकांनी व्यक्त केली.सालाबाद प्रमाणे यावर्षीही मंगलमूर्ती प्रतिष्ठानचा हा पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या दिमाखात व गर्दीत संपन्न झाला. यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत, आ. किरण सामंत, रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे, भूतपूर्व नगराध्यक्ष सौ. राजेश्‍वरी शेट्ये, मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. उर्मिलाताई घोसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित अतिथींचे स्वागत व परिचय श्री. विनायक हातखंबकर सर यांनी करुन दिला. त्यानंतर श्री. सुधाकरराव सावंत यांनी सर्वांना सुख शांती मिळावी यासाठी श्री गणेशाला गार्‍हाणे घातले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी यावर्षीच्या स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष श्री. राजन शेट्ये, श्री. नित्यानंद दळवी, श्री. उपेंद्र सुर्वे, श्री. संदीप डोंगरे, श्री. देवदत्त पेंडसे, श्री. राजेंद्र नेरकर, ज्येष्ठ उद्योजक श्री. विजयशेठ ओसवाल, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दिलीप पाखरे, श्री. संजय वैशंपायन, श्री. विनायक हातखंबकर सर, श्री. सुनील नलावडे, श्री. किशोर मोरे, श्री. राकेश चव्हाण, श्री. दिपक राऊत, श्री. सुधाकरराव सावंत आदी मान्यवरांनी अथक परीश्रम घेतले.

टाइम्स स्पेशल

तसेच या कार्यक्रमासाठी श्री. अनिल नागवेकर, श्री. राजन बोडेकर, श्री. निलेश लाड, श्री. विजय सुर्वे, श्री. रमाकांत पांचाळ सर, ऍड. विनय आंबुलकर, ऍड. सौ. शाल्मली आंबुलकर, सौ. यज्ञा वीरकर, सौ. जया डावर, श्री. दिपक देसाई, श्री. अशोक आंबवकर, श्री. विनायक चव्हाण, श्री. प्रकाश शिंदे, श्री. राजाराम सुर्वे, श्री. पी. डी. सावंत, श्री. अविनाश तथा सरु सावंत यांनीही फार मोठे परीश्रम घेतले. या पारितोषिक वितरण सोहळ्याचे बहारदार सूत्रसंचालन ऍड. विनय आंबुलकर व ऍड. सौ. शाल्मली आंबुलकर या दांपत्याने अतिशय बहारदारपणे केले. त्यांच्या परीश्रमाला सर्व उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करुन पसंतीची पोचपावती दिली. ते मंगलमूर्ती प्रतिष्ठानचे एक आधारस्तंभ असून मंगलमूर्ती सजावट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याचे सूत्र संचालन करण्याचे कार्य ते आपुलकीने करीत असतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg