loader
Breaking News
Breaking News
Foto

आरोस येथील राज्यस्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेत लिंगेश्वर पावणादेवी भजन मंडळ प्रथम

आरोस (वार्ताहर) - श्री देवी माऊली सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त आरोस येथील श्री देवी माऊली मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेत लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ, कणकवली-जानवली यांनी प्रथम क्रमांक पटकावला. महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी यांनी द्वितीय, तर स्वरब्रह्म प्रासादिक भजन मंडळ, देवगड यांनी तृतीय क्रमांक मिळविला. उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक दत्तप्रसाद प्रासादिक भजन मंडळ, वर्दे यांना, तर उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक श्री देव इसवटी पंचदेवी प्रासादिक भजन मंडळ, न्हावेली यांना देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेतील अन्य पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट गायक म्हणून लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळाचे बुवा योगेश मेस्त्री, उत्कृष्ट गवळण म्हणून महापुरुष प्रासादिक भजन मंडळाचे बुवा प्रसाद आमडोसकर, उत्कृष्ट गजर म्हणून श्री देव इसवटी पंचदेवी प्रासादिक भजन मंडळाचे बुवा सूरज पार्सेकर यांची निवड झाली. उत्कृष्ट कोरसचा पुरस्कार लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळाला, तर उत्कृष्ट शिस्तबद्ध संघाचा पुरस्कार स्वरब्रह्म प्रासादिक भजन मंडळ, देवगड यांना मिळाला. उत्कृष्ट हार्मोनियम वादक म्हणून बुवा प्रसाद शेवडे, उत्कृष्ट पखवाज वादक म्हणून सागर वारखंडकर (गोठण प्रासादिक भजन मंडळ, वजराट), तर उत्कृष्ट तबला वादक म्हणून कमलेश सुतार (दत्तप्रसाद प्रासादिक भजन मंडळ, वर्दे) यांनी पुरस्कार पटकावले.

टाईम्स स्पेशल

या स्पर्धेला निखिल नाईक, बाळा परब, आनंद परब, सत्यवान नाईक, दत्तगुरू दळवी, संदेश देऊलकर, महेश कुबल, रितेश नाईक, सिद्धू कुबल, गुरुप्रसाद गाडगीळ, सुहास कोरगावकर, यशवंत नाईक, सोमेश्वर चव्हाण, रोशन नाईक, गणपत नाईक, गौरेश नाईक, नारायण चव्हाण, सार्थक नाईक, महेश आरोसकर, विनायक नाईक, रुपेश पटेकर, अमर नाईक, विठ्ठल आयर, देवेंद्र कुबल आणि प्रवीण मेस्त्री यांनी पुरस्कृत केले होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून पाडलोस येथील अमेय गावडे आणि गोवा येथील सुरेश केळकर यांनी काम पाहिले. स्पर्धेचे सूत्रसंचालन तनया रेडकर आणि निखिल नाईक यांनी केले. स्पर्धेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये बोंबडो आरोसकर, अक्षय देऊलकर, शरद नाईक, गौरेश पाटकर आणि सिद्धेश कुबल हे विजेते ठरले. श्री देवी माऊली सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित या स्पर्धेला भजनप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg