loader
Breaking News
Breaking News
Foto

न्यू इंग्लिश स्कूल तुंबाडला खालिदभाई चौगुले यांच्याकडून वॉटर कुलर भेट

खेड : बहिरवली येथील ग्रामस्थ व सध्या दुबई येथे व्यवसायानिमित्त कार्यरत असलेले दानशूर व्यक्तिमत्त्व खालिदभाई चौगुले यांच्यामार्फत न्यू इंग्लिश स्कूल तुंबाड या माध्यमिक शाळेला ६० लिटर क्षमतेचा सेन्सरसह वॉटर कुलर व वॉटर प्युरिफायर शैक्षणिक उठावांतर्गत भेट देण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी तुंबाड हायस्कूलमध्ये खालिदभाई चौगुले यांचे बंधू अब्दालाभाई चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांना स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची पिण्याच्या पाण्याची सोय होण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमाला तुंबाडचे सरपंच बेंडू कदम, पोलीस पाटील हरिश्चंद्र कदम, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रामचंद्र घडशी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अस्मिता शिंदे, तुंबाड शिंदेवाडी महिला मंडळाच्या सदस्या, शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत खेडेकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

यावेळी शाळेच्या वतीने मुख्याध्यापक प्रशांत खेडेकर यांनी अब्दालाभाई चौगुले यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि या स्तुत्य उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व भौतिक सुविधांसाठी दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेणे ही समाजासाठी प्रेरणादायी बाब असून, खालिदभाई चौगुले यांनी केलेल्या या मदतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg