मालवण (प्रतिनिधी) - महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली दि. २ ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कोकण-पश्चिम महाराष्ट्र विभागीय टेबल टेनिस स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा कुंभारमाठ येथील गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक कॉलेज जवळील माघी गणेश हॉल येथे पार पडणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे सचिव हेमंत वालकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. कुंभारमाठ येथील माघी गणेश हॉल येथे पत्रकार परिषद झाली.
यावेळी महासिंधु टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष विष्णू कोरगावकर, उपाध्यक्ष किरण पिंगुळकर, सहसचिव दीपक जाधव तसेच विलास परुळेकर, दिलीप हुनारी, गुरुनाथ राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या मानाच्या विभागीय स्पर्धेत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या आठ जिल्ह्यांमधील खेळाडू, प्रशिक्षक, पंच व क्रीडा अधिकारी सहभागी होणार आहेत. आतापर्यंत तब्बल २१५ खेळाडूंनी आपली अधिकृत नोंदणी पूर्ण केली असल्याचे सचिव हेमंत वालकर यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील एवढ्या मोठ्या आणि मानाच्या स्पर्धेचे आयोजन प्रथमच मालवण-कुडाळ परिसरात होत असल्याने हा जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण ठरणार आहे. या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील स्पर्धात्मक टेबल टेनिसला नवे प्रोत्साहन मिळेल, क्रीडा संस्कृतीचा विकास होईल आणि युवा खेळाडूंना त्यांची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी राष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ मिळेल. तसेच मालवण-सिंधुदुर्गला उदयोन्मुख क्रीडा पर्यटनस्थळ म्हणून गती मिळेल, असा विश्वास अध्यक्ष विष्णू कोरगावकर यांनी व्यक्त केला. या महत्त्वपूर्ण क्रीडा स्पर्धेला जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी, सामाजिक संस्था आणि प्रसारमाध्यमांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवावा व सहकार्य करावे, असे आवाहन सचिव हेमंत वालकर यांनी असोसिएशनच्या वतीने केले आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.