loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार किरण सांमत यांच्या मार्गदर्शनानुसार मठ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात एकूण २३ वनराई बंधारे

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - यंदा पर्जन्यमान कमी झाल्यामुळे तालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी जलसंधारणाची कामे करणे काळाची गरज बनली आहे. याच सामाजिक जाणिवेतून लांजा राजापूर विधानसभेचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी तालुक्यात जास्तीत जास्त वनराई बंधारे बांधण्याचे मिशन हाती घेतले आहे. याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मठ कार्यक्षेत्रात मठ सोमेश्वर मंदिराजवळ वनराई बंधारा बांधण्यात आला असून गावात एकूण २३ बंधारे बांधण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमात आमदार किरण उर्फ भैय्या सामंत, जिल्हा परिषद रत्नागिरीचे उपाध्यक्ष विलास चाळके, लांजा सभापती मानसी आंबेकरए जि. प. सदस्य रेवाळे, पंचायत समिती सदस्या दिपाली दळवी, गटविकास अधिकारी गिरी, विस्तार अधिकारी संजय लोखंडे, कुंभार, सुवारे, सर्व ग्रामस्तरीय अधीकारी, कर्मचारी व बचतगट महिला प्रतिनिधी, गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित राहून सहभागी झाले होते. आज पर्यंत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात एकूण २३ बंधारे बांधून पूर्ण झाले असून भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी या बंधार्‍यांचा फायदा ग्रामस्थांना होणार, असल्याचे गटविकास अधिकारी गिरी यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg