loader
Breaking News
Breaking News
Foto

सेवा संकल्प अभियानांतर्गत १६ ऑक्टोबर रोजी जामगे येथे माजी सैनिकांचा मेळावा

खेड (प्रतिनिधी) - जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने सेवा संकल्प अभियानाचे औचित्य साधून वीर माता-पिता, वीर नारी व माजी सैनिकांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता खेड तालुक्यातील छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल, जामगे येथील सभागृहात पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मेळाव्यात माजी सैनिकांच्या पेन्शनविषयक तक्रारी, अभिलेख (रेकॉर्ड) कार्यालयाशी संबंधित बाबी, महासैनिक पोर्टलवरील नोंदणी तसेच इतर विविध प्रशासकीय अडचणींचे प्रत्यक्ष निराकरण केले जाणार आहे. मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या संबंधितांनी माजी सैनिक/विधवा ओळखपत्र, डिस्चार्ज बुक, पी.पी.ओ.ची प्रत, आधार कार्ड व पॅन कार्ड, बँक पासबुक व ई.सी.एच.एस. कार्ड, आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल फोन आणणे आवश्यक आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg