लांजा (संजय साळवी) - मुंबई - गोवा महामार्गावरील कुवे पुरागाव येथे एका दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका ५४ वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला असून धडक देणारा दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. याबाबत लांजा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर सिताराम गुरव (५४ वर्षे, रा. वनगुळे गुरववाडी ता. लांजा) हे रविवारी सायंकाळी आपल्या ताब्यातील मेस्ट्रो दुचाकी ( क्र. एमएच. ०८. एसी. १८८९) घेऊन मुंबई - गोवा महामार्गावरून वनगुळेच्या दिशेने जात होते. ते कुवे पुरागाव येथे आले असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या डीओ दुचाकीने (एमएच. ०८. एएम.९२२७) गुरव यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. ही दुचाकी प्रथमेश रमेश करंबळे (२६ वर्षे, रा. आगरवाडी लांजा, ता. लांजा) चालवित होता.
या अपघातात मनोहर गुरव आणि प्रथमेश करंबळे हे दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर काही वेळातच मनोहर गुरव यांचा मृत्यू झाला. तर प्रथमेश करंबळे याला पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी सुहास सखाराम भोवड (३४ वर्षे, रा. वनगुळे खालचीवाडी ता. लांजा) यांनी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार प्रथमेश करंबळे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६ (१), १२५ (अ), १२५ (ब), २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत पुढील तपास लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय मारळकर हे करीत आहेत.







12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)



















































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.