loader
Breaking News
Breaking News
Foto

अवैध दारूविक्रीविरोधात आमदार किरण सामंत आक्रमक; पोलीस व उत्पादन शुल्क विभागाला कारवाईचे निर्देश

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध गावठी दारू आणि गोवा बनावटीच्या मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी आक्रमक भूमिका घेतली असून जिल्ह्यातील अवैध मद्यविक्रीवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पोलीस अधीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात अवैध गावठी दारू आणि विषारी गोवा बनावटीच्या मद्याची खुलेआम विक्री सुरू असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या अवैध मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी संबंधित यंत्रणेला कठोर कारवाईचे आदेश द्यावेत, या संदर्भात रत्नागिरी जिल्हा देशी मद्य विक्रेता संघाच्या वतीने आमदार किरण सामंत यांना शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे गुरुवारी निवेदन देण्यात आले. आमदार सामंत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कमी पैशांत मिळणार्‍या निकृष्ट दर्जाच्या गावठी दारूमुळे अनेक तरुणांचे प्राण धोक्यात येत आहे. मुख्यतः अवैध मद्यविक्रीमुळे महाराष्ट्र शासनाच्या महसुलाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शासकीय मद्यविक्री कमी झाल्याने आणि सातत्याने वाढणार्‍या शुल्कामुळे परवानाधारक मद्यविक्रेत्यांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

टाईम्स स्पेशल

या सर्व बाबींचा विचार करून रत्नागिरी जिल्ह्यातील अवैध दारूविक्री तातडीने बंद करण्यासाठी जिल्हा प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाला आवश्यक निर्देश द्यावेत. त्याचप्रमाणे अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्री करणार्‍यांविरोधात कारवाई करून शासनाचा महसूल सुरक्षित ठेवण्यात यावा. असे विविध विषय निवेदनाद्वारे मांडण्यात आले होते. त्याअनुषंगाने आमदार किरण सामंत यांनी पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागांना कारवाईचे तसेच त्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकार्‍यांना आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, यावेळी जिल्ह्यातील देशी मद्य विक्रेता संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg