loader
Breaking News
Breaking News
Foto

दांडेली येथे १४ रोजी जिल्हास्तरीय भजन स्पर्धा; प्रथम क्रमांकासाठी १५ हजारांचे पारितोषिक, नामवंत भजन मंडळांचा सहभाग

बांदा (प्रतिनिधी) - दांडेली येथील श्री देव दाडोबा देवस्थान व ग्रामस्थ मंडळ, दांडेलीच्या वतीने शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी भव्य जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ठीक ५.३० वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दांडेली (श्री देव दाडोबा देवस्थान प्रवेशद्वाराजवळ) येथे स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध नामांकित प्रासादिक भजन मंडळे सहभागी होणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रथम क्रमांकासाठी १५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ११ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी ७ हजार रुपये व मान्यवरांच्या हस्ते कायमस्वरूपी चषक प्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय उत्कृष्ट गायक, तबलावादक, हार्मोनियमवादक, झांजवादक, पखवाजवादक, कोरस आदींसाठी वैयक्तिक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेसाठी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. भजनप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg