loader
Breaking News
Breaking News
Foto

दिवाळीत विद्यार्थ्यांना अनोखी अक्षर भेट; टोपीवाला हायस्कूलचा वर्षभर वाचन उपक्रम

मालवण (प्रतिनिधी) - दिवाळी म्हटली की भेटवस्तूंची देवाणघेवाण आलीच; मात्र टोपीवाला हायस्कूलने इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या रूपाने ज्ञानाची अनोखी भेट दिली आहे. मराठी विभागाच्या वतीने आणि माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना ‘किशोर’ आणि ‘साधना’ या दिवाळी अंकांचे मोफत वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, बालभारतीतर्फे प्रकाशित होणारे ‘किशोर’ मासिक विद्यार्थ्यांना पुढील संपूर्ण वर्षभर दर महिन्याला मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता सहावीसाठी वाचनालयाचा तास ठेवण्यात आला आहे. या उपक्रमाचा प्रभावी उपयोग करून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, मराठी भाषेविषयी प्रेम वाढावे, त्यांची कल्पनाशक्ती आणि विचारक्षमता विकसित व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. अनेक पिढ्यांच्या बालवाचकांना वाचनाची गोडी लावणाऱ्या किशोर या मासिकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर महिन्याला नवे साहित्य, नवे विषय आणि विचारांचे नवे विश्व अनुभवता येणार आहे.

टाईम्स स्पेशल

भेटवस्तूंचा आनंद काही काळ टिकतो; मात्र पुस्तकांशी जडलेली मैत्री आयुष्यभर सोबत करते. याच विचारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ दिवाळी अंकांची भेट मिळाली नाही, तर वर्षभर वाचनाची समृद्ध संधीही उपलब्ध झाली आहे. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक वळंजू, पर्यवेक्षक वेरलकर, डॉ. ज्योती तोरसकर, अक्षता तांबे, महेश धामापूरकर, कोकरे आणि सुधीर गोसावी यांनी विशेष प्रयत्न केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg