मंडणगड (प्रतिनिधी) : भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि भूजलपातळी वाढविण्याच्या उद्देशाने मंडणगड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत देव्हारे हद्दीतील मालेगाव येथील सार्वजनिक विहिरीजवळ ‘मिशन बंधारा’ हा जलसंधारण उपक्रम राबविण्यात आला. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा जमिनीत निचरा होण्यास मदत व्हावी, या उद्देशाने बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये एकाच वेळी ‘मिशन बंधारा’ उपक्रम राबविण्याबाबत जिल्हा परिषदेकडून सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यानुसार ग्रुप ग्रामपंचायत देव्हारेच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेनेचे मंडणगड तालुका उपाध्यक्ष संजीव येसावरे यांच्या नियोजनाखाली बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा जमिनीत निचरा वाढविणे, भूजलपातळी सुधारण्यास हातभार लावणे आणि उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईची तीव्रता कमी करणे, यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ग्रामपंचायत स्तरावर लोकसहभागातून राबविण्यात येणारे जलसंधारणाचे उपक्रम ग्रामीण भागातील पाणी नियोजनाला बळकटी देणारे ठरतात. भविष्यात पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
या उपक्रमावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर, देव्हारेचे ग्राम महसूल अधिकारी अमोल पाटील, पालवणीचे ग्राम महसूल अधिकारी रतन साळुंखे, उन्हवरेचे ग्राम महसूल अधिकारी नयन बोबडे, ग्रुप ग्रामपंचायत देव्हारेच्या सरपंच प्रमिला दळवी, ग्रामपंचायत सदस्या अर्चना दुर्गवले व प्रतिभा मांडवकर, ग्रामविकास अधिकारी दिपाली गुळेकर, अंगणवाडी शिक्षिका ऐश्वर्या कंचावडे, स्वरा मांडवकर, प्रतीक्षा येसावरे, आशासेविका समीक्षा हुमणे, महसूल सेवक सुनीत गमरे, ग्रामपंचायत कर्मचारी गजानन भावे, नागेश तांबे व विजय जाधव, उद्योजक रोशन फराटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.



















































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
















































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.