loader
Breaking News
Breaking News
Foto

शायना एनसीच्या फोटोला जोडे मारून कणकवलीत ठाकरे सेनेने केला निषेध

कणकवली (प्रतिनिधी) - शिंदे शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव यांच्या नेतृत्वाखाली कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शिवसेना शाखा येथे शायना एनसीच्या फोटोला "जोडे मारो" आंदोलन केले. याप्रसंगी बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या शायना एनसीला पाठीशी घालणाऱ्या शिंदे गटाचा निषेध असो! शायना एनसी हाय हाय! शायना एनसी मुर्दाबाद! शायना एनसीचे करायचे काय खाली डोके वर पाय! अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख माजी आम. वैभव नाईक, कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी नीलम पालव म्हणाल्या, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी संघर्ष केला. त्यासाठी त्यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. तो पक्ष शिंदे गटाने चोरून, परप्रांतीय शायना एनसीला हाताशी धरून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा फोटो फाडला आहे. त्यामुळे बाळासाहेबांचा घोर अपमान झाला असून याचा आम्ही सर्व शिवसैनिक तीव्र निषेध करतो. महायुती सरकार असंवेदनशील असून त्यांनी महाराष्ट्रात कुठलेही चांगले काम न करता निव्वळ असे खोडसाळ चाळे करून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचे काम केले आहे. शायना एनसीने जे कृत्य केले त्यामुळे राज्यातील तमाम शिवसैनिकांचाही अपमान झाला असून शायना एनसी जिथे मिळेल तिथे तिला चप्पलाचे जोडे मारले पाहिजेत, असे आवाहन नीलम पालव यांनी केले.

टाईम्स स्पेशल

याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली तालुकाप्रमुख राजू राठोड, नगरसेवक संकेत नाईक, राजू राणे, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, दिव्या साळगावकर, संजना कोलते, ॲड. हर्षद गावडे, विभागप्रमुख विलास गुडेकर, बबली राणे, रवींद्र खांदारे, रुपेश आमडोसकर, नितीन राऊळ, महेश देसाई, रोहित राणे, अजित काणेकर, अरुण परब, पराग म्हापसेकर, प्रमोद सावंत, सुरेंद्र पाटेकर,सुरेश मेस्त्री, मंगेश राणे, चेतन वालावलकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg