loader
Breaking News
Breaking News
Foto

देवगड प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयाचा ३५ वा वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा

देवगड (प्रतिनिधी) - प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या देवगड सेंटरचा ३५ वा वर्धापन दिन विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त गोवा-सिंधुदुर्ग विभागाच्या संचालिका शोभा दीदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी उपस्थितांना आध्यात्मिक मार्गदर्शन करताना जीवनामध्ये साधना आणि सेवा यांचे महत्त्व अधोरेखित केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मार्गदर्शन करताना शोभा दीदी म्हणाल्या की, मनुष्य जीवनामध्ये चांगले, प्रामाणिक आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व घडवायचे असेल, तर साधना आणि सेवा या दोन्ही गोष्टींना विशेष महत्त्व दिले पाहिजे. आपण आपली साधना मनापासून आणि सेवा प्रामाणिकपणे केली, तर निश्चितच आपल्यामध्ये सकारात्मक परिवर्तन घडते. साधनेतून आत्मिक शक्ती मिळते, तर सेवेतून दुसऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याची संधी मिळते. त्यामुळे जीवन समृद्ध आणि अर्थपूर्ण करण्यासाठी साधना व सेवेला आपल्या आचरणात स्थान दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. या वर्धापन दिनानिमित्त सकाळपासूनच केंद्रामध्ये साधना, आध्यात्मिक चिंतन तसेच ईश्वरीय सेवाकार्य कशा पद्धतीने करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात येत होते. महाराष्ट्राच्या विविध भागांतील ब्रह्मकुमारी केंद्रांच्या संचालिका दीदींसह संध्या दीदी, मेघा दीदी, तालुक्यातील ब्रह्मकुमारी दीदी, बहिणजी तसेच विविध क्षेत्रांतील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

संपूर्ण कार्यक्रमादरम्यान आध्यात्मिक विचार, भक्ती, आत्मचिंतन आणि ईश्वरीय स्मरण यामुळे परिसरात प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते. अत्यंत शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक पार पडलेल्या या सोहळ्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जणू परमेश्वराच्या साक्षीनेच हा आध्यात्मिक सोहळा भक्तिभावात रंगला होता. देवगड केंद्राच्या संचालिका मेघा दीदी यांनी वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे केलेले सुंदर आणि नियोजनबद्ध आयोजन विशेष कौतुकास्पद ठरले. ३५ वर्षांच्या आध्यात्मिक प्रवासाचा टप्पा गाठताना साधना, सेवा आणि सकारात्मक विचारांचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प या वर्धापन दिनातून अधोरेखित झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg