दापोली (चंद्रशेखर जोशी) : दापोली तालुक्यातील वणौशी (भिवबंदर)—आघारी गावात प्रस्तावित असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाचे संभाव्य दुष्परिणाम जाणून घेण्यासाठी तसेच या प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी वणौशी तर्फे पंचनदी आणि दुमदेव गावातील अणुऊर्जा प्रकल्प विरोधी संघर्ष समितीच्या वतीने २३ नोव्हेंबर रोजी जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते भावेश अरुण कारेकर यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना पर्यावरण संरक्षण, स्थानिक जनतेचे हक्क आणि प्रस्तावित प्रकल्पाचे संभाव्य दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. यापूर्वी भावेश कारेकर यांनी आपल्या मांदिवली गावातील प्रस्तावित खाण प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांना एकत्रित करून शासनाकडे सातत्याने तक्रारी केल्या आणि त्याचा पाठपुरावा केला. ग्रामस्थांच्या एकजुटीच्या आणि लोकशाही मार्गाने केलेल्या संघर्षाच्या माध्यमातून हा प्रकल्प महिन्याभरात रोखण्यात यश मिळाल्याचा अनुभव त्यांनी यावेळी मांडला.
तसेच जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भातील वस्तुस्थिती आणि अनुभव मांडण्यासाठी शाश्वत कोकण टीमच्या वतीने सचिन चव्हाण आणि योगेश कांबळे उपस्थित होते. पर्यावरणप्रेमी पंकज दळवी यांनीही वेळात वेळ काढून सभेला उपस्थिती लावली. सर्व निमंत्रितांनी ग्रामस्थांशी सविस्तर संवाद साधून त्यांच्या शंका, प्रश्न आणि चिंतांवर मार्गदर्शन केले. गावाचे भवितव्य, पर्यावरणाचे संरक्षण, स्थानिकांच्या उपजीविकेवर होणारे संभाव्य परिणाम आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन या विषयांवर चर्चा करण्यात आली. कोणताही निर्णय घेताना स्थानिक ग्रामस्थांचे मत, संमती आणि हित यांना प्राधान्य मिळाले पाहिजे. आपल्या हक्कांसाठी लोकशाही मार्गाने आणि एकजुटीने लढा देणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या सभेला अणुऊर्जा प्रकल्प विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष दीपक घडशे, पांडुरंग दवंडे, उपाध्यक्ष अशोक जाधव व दिनेश गुरव, सचिव अनिष निंबकर, प्रशांत दवंडे व मनीष चव्हाण, उपसचिव रुपेश कुटरेकर व प्रमोद गमरे यांच्यासह वणौशी व दुमदेव तसेच मुंबई येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. सभेच्या शेवटी निमंत्रित मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. कोकणची निसर्गसंपदा, गावांचे अस्तित्व आणि स्थानिक जनतेचे हक्क जपण्यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने उभे राहण्याचा निर्धार या सभेत व्यक्त केला.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.