loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी नगरपरिषदेच्या सर्व १६ प्रभागांतील सफाई कामगारांना दिवाळी फराळाचे वाटप

रत्नागिरी : दिवाळी सणाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत व राजापूर-साखरपा-लांजा मतदार संघाचे आमदार किरण भैय्याशेठ सामंत यांच्या माध्यमातून रत्नागिरी नगरपरिषदेच्या सर्व १६ प्रभागांतील सफाई कामगारांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सफाई कामगारांच्या कार्याचा सन्मान आणि त्यांच्या आनंदात सहभागी होण्याच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. सण-उत्सवाच्या काळातही शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या या कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी शिवसेनेच्या नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख सुदेश दादा मयेकर, शहर प्रमुख बिपिन बंदरकर, नगरसेविका प्रीतीताई सुर्वे, नगरसेवक सौरभ मलुष्टे, पाणी सभापती निमेश नायर, नगरसेविका मेधाताई कुलकर्णी, जागृती पिलणकर, सायली पाटील, पुजा पवार, गटनेते बाळू साळवी, नगरसेवक बाबा नागवेकर, बंटी किर, अभिजित दुडये, विभागप्रमुख दिपक पवार आदी मान्यवर उपस्थित होते. सफाई कामगारांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलवणाऱ्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा संदेश देण्यात आला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg