loader
Breaking News
Breaking News
Foto

आगवे अंगणवाडीत बाल दिन उत्साहात साजरा; पूजा निकम यांच्याकडून 'थ्रीडी एआय' उपकरणाची पाहणी

चिपळूण (संतोष पिलके): १४ नोव्हेंबर बाल दिनानिमित्त आगवे येथील अंगणवाडी शाळेत माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्या सौ. पूजा निकम यांनी विद्यार्थ्यांना पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच, अंगणवाडीत उपलब्ध करून देण्यात आलेल्या 'इंटरॅक्टिव्ह मॅटसह थ्रीडी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)' या अत्याधुनिक उपकरणाची त्यांनी यावेळी पाहणी केली व विद्यार्थ्यांमवेत त्याचे प्रात्यक्षिकही अनुभवले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आमदार शेखर गोविंदराव निकम यांच्या विशेष प्रयत्नातून कोयना भूकंप पुनर्वसन निधी (२०२५-२६) अंतर्गत ५० अंगणवाड्या आणि १० जिल्हा परिषद शाळांना ही उपकरणे देण्यात आली आहेत. या तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी व इंग्रजी अक्षरे, बाराखडी आणि शब्दांची ओळख सहज होत असून शिक्षणाची विशेष आवड निर्माण झाली आहे, अशी माहिती अंगणवाडी सेविकांनी चर्चेदरम्यान दिली. भविष्यात शिक्षणासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरेल, असे मत व्यक्त करत पूजा निकम व सेविकांनी आमदार शेखर निकम यांचे आभार मानले. याप्रसंगी अंगणवाडी सेविका, विद्यार्थी व माता-पालक उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg