loader
Breaking News
Breaking News
Foto

पडेल येथे ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

देवगड (प्रतिनिधी) - पडेलकर बौद्धजन सहकार मंडळ, पडेल-मुंबई/ग्रामीण व समस्त महिला यांच्या संयुक्त विद्यमाने समतानगर, पडेल येथे ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन तथा सम्राट अशोक विजयादशमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या मंगलमय सोहळ्याला महिलांसह समाजबांधवांची लक्षणीय उपस्थिती होती. सकाळच्या सत्रात ग्रामीण संस्थेचे कार्याध्यक्ष अतुल पडेलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महिला कार्यकारिणीच्या सदस्या वैष्णवी पडेलकर, आश्विनी पडेलकर, तन्वी पडेलकर, वर्षा पडेलकर आणि श्रावस्ती पडेलकर यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर धम्मवंदना, सुत्तपठण, त्रिसरण-पंचशील, भीमस्मरण, भीमस्तुती आणि बुद्धपूजापाठ असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. ग्रामीण संस्थेचे सरचिटणीस विश्वनाथ पडेलकर यांनी या कार्यक्रमांचे संचालन केले. दुपारी १ ते ४ या वेळेत भगवान बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित ध्वनिमुद्रित प्रबोधनपर कार्यक्रम सादर करण्यात आला. रात्री ८ वाजता स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमालाही सभासद व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रामीण संस्थेचे सरचिटणीस विश्वनाथ पडेलकर यांनी केले. ग्रामीण संस्थेच्या महिला अध्यक्षा तन्वी अतुल पडेलकर यांनी आभार मानले. सरणत्तय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg